सावंतवाडी : सर्वोदय नगर परिसरात मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेतील श्वान कोपऱ्यात वेदनेनं पडून असल्याचे प्राणिप्रेमी नी पाहिले. श्वानाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानं वेदनेनं व्याकुळ या मुक्या जीवाला पाहून शहरातील युवकांसह सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर त्याच्या मदतीला धावले होते. गेले काही दिवस रस्त्याशेजारी या श्वानावर उपचार सुरू होते. दरम्यान, देव्या सुर्याजी गृपच्या पार्थिल माठेकर यांना ही गोष्ट समजताच त्या श्वानाला माठेवाडा इथं हलविण्यात आले. त्या ठिकाणी या श्वानावर पुढील १५ दिवस उपचार करण्यात येणार असून कुडाळ येथील प्राणीप्रेमी डॉक्टर हे उपचार करत आहेत. यामध्ये युवा फोरम प्रदेशाध्यक्ष संपदा तुळसकर, पार्थिल माठेकर, सावंतवाडी उप प्रदेशाध्यक्ष मिहिर मोंडकर, सचिव संकेत नेवगी, राशी परब, गौरांग भाट, पंकज बिद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. युवा फोरमच्या माध्यमातून गेले काही दिवस या श्वानाची देखभाल केली जात असून या श्वानाला व्याधीमुक्त करण्याचा निर्धार या युवकांनी केला. तर युवा रक्तदाता संघटना, देव्या सुर्याजी गृपची साथ त्यांना लाभली असून याआधी कोरोनाकाळात मुक्या जीवांना अन्नदान करण्याचं काम त्यांनी केले आहे. ही संघटना नेहमीच मुक्या जीवांच्या मदतीसाठी पुढे असते. आठवडाभर श्वानाच्या डोक्यात अडकलेली बरणी काढण्याच रेस्क्यु अॉपरेशन देखील या संघटनेने केल होत.आजकाल रक्ताच नात सुद्धा संकंटाच्यावेळी पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत. मात्र, या युवकांनी आपल्या कृतीतून याला फाटा फोडत भुतदया दाखवून दिलीय. शहरातील नागरिकांनी देखील यात मोठ सहकार्य केलय.