बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कामगाराचा रोकडेसह पलायन.;सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कामगाराचा रोकडेसह पलायन.;सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सावंतवाडी /-

सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावंतवाडी दुकानातील मोबाईल रिचार्जचे पैसे बँकेत भरण्यासाठी पाठविलेला कामगार पैसे व दुचाकी घेऊन फरार झाल्याची तक्रार कोलगाव चव्हाटावाडी येथील योगेश देऊ धुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार रोहित साबा जाधव वय 19 रा. कोलगाव जाधवाडी याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की योगेश धुरी त्याच्याकडे एका मोबाईल रिचार्ज कंपनीची एजन्सी आहे त्यासाठी त्याने रोहित जाधव याला आपल्याकडे कामासाठी ठेवले आहे गेले कित्येक वर्ष रोहित जाधव हा धुरी याच्याजवळ काम करतो. यासाठी त्याला दुचाकी ही देण्यात आली आहे. अलीकडे जमलेले मोबाईल रिचार्जचे 85 हजार रुपये योगेश धुरी याने बँकेत भरण्यासाठी रोहित जाधव यांच्याकडे दिले होते मात्र दिवाळी सणानिमित्त बँकेला सलग असलेली सुट्टी यामुळे सदरचे पैसे रोहित त्याच्या जवळ होते मात्र गेले दोन दिवसापासून रोहित याचा फोन बंद येत आहे,त्याच्या जवळ असलेली दुचाकी ही त्याच्या घरी अजून आले नाही घरच्यांकडे चौकशी केली असता सोमवार रात्री पासून तो घरात न सांगता निघून जाण्याचे नातेवाइकांनी सांगितले दरम्यान याप्रकरणी योगेश पुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहित याच्यावर स्वतःच्या फायद्यासाठी पैसे व दुचाकी घेऊन फरार झाल्या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस तपासामध्ये त्याच्या मोबाईल चे लोकेशन नजीकच्या गोवा राज्यात दाखवण्यात येत आहे अधिक तपास सावंतवाडी पोलिस करत आहे.

अभिप्राय द्या..