अभिनेत्री काजल वालावलकर,प्राजक्ता वाडये,प्रतिभा चव्हाण यांची उपस्थिती.
मालवण /-
मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मान पत्र प्रदान व सत्कार सोहळा लोकनेते आर. जी. चव्हाण हॉल वायरी मालवण येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका सौ. मिथिला नागवेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये, अभिनेत्री सौ. प्रतिभा चव्हाण, अभिनेत्री काजल वालावलकर , संस्थापक संतोष लुडबे , अध्यक्ष आप्पा चव्हाण , जेष्ठ संगीततज्ञ भालचंद्र केळूसकर, जेष्ठ कलाकार श्री.लुडबे, तसेच २५ अभिनेत्री व्यासपीठावर उपस्थित होत्या .
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.
….प्राजक्ता वाडयेचे मालवणी भाषेत मनोगत ……
जिल्ह्यातल्या जेष्ठ अभिनेत्रींचा माका मार्गदर्शन गावला… म्हणान मी हयपर्यंत पोचलय…असे ॠण व्यक्त करुन माका ह्याच्याही पुढे पल्लो गाठण्यासाठी तुमचो आशीर्वाद माझ्या पाठीशी आसादे …..असे भावनिक आवाहन प्राजक्ता वाडये हिने केले त्याला उपस्थितांनी दाद दिली.
…… कोणीतरी आपली दखल घेतली या भावनेने ….
सत्कारमूर्ती जेष्ठ अभिनेत्री भावूक झाल्या……..
यावेळी उपस्थित जिल्ह्यातील जेष्ठ व नवोदित अशा २५ अभिनेत्रीना प्रमुख पाहुण्या अभिनेत्री व इतर मान्यवर यांच्या हस्ते रंग सन्मानपत्र शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यामध्दे सुजाता शेलटकर, निर्मला टिकम,गीता आंगणे, नमिता गावकर, गीताली मातोंडकर, अनिता कोळसूमकर, मिनल तोरसकर, ज्योती राउळ, माधुरी गोवेकर, माधुरी मेस्त्री, योगिता शेलटकर, सीमा तेंडुलकर, मेघा पार्सेकर, दिक्षा वेंगुर्ले कर , तेजस्वी राऊळ , अनिता वेंगुर्ले कर , तेजस्वी राऊळ, रुचिता शिर्के, वर्षा आचरेकर, प्रभा जोशी , प्रणाली कासले, तन्वी वेंगुर्लेकर, सिध्दी माणगावकर, दिपाली परब आदिंचा समावेश होता.यावेळीविविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई व विनोद सातार्डेकर यांनी केले.कार्यक्रमाला प्रेक्षकांचा व चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक संतोष लुडबे, अध्यक्ष आप्पा चव्हाण व संचालकांनी मेहनत घेतली.