▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा.
▪️काबुलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात १८ जणांचा बळी तर ५७ जण जखमी.
▪️संपूर्ण देशच कोरोनाने ग्रासला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयांना कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे :- अरविंद केजरीवाल.
▪️मान्सुन येत्या २ – ३ दिवसांत माघार घेइल. त्यामुळे भारतातून २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस संपलेला असेल असे भाकीत हवामान विभागाने केले आहे.
▪️सण उत्सवाच्या काळात बाजारात खरेदीला जाताना व्होकल फॉर लोकलचा अवलंब करा. मन कि बात मधून पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना आवाहन.
▪️दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश मधील नोइडात शाई तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण आग. सुदैवाने जीवित हानी टळली. करोडोंचे नुकसान.
▪️विजयादशमी निमित्त पंढरपूरातील विठुरायाला राउळी सोनेरी झेंडुचा साज. मंदिर परिसरातही केली आकर्षक फुलांची सजावट.
▪️पुणे – बंगळूर महामार्गावर खासगी आराम बसमधून ३ कोटी ६४ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त.
▪️आमचे सरकार गणपतीला पाडायला निघालेल्यानी दसरा आल्याची जाण ठेवावी. महाविकास आघाडी आता महापालिका निवडणूकीतही एकत्र लढणार :- संजय राऊत.
▪️मि घर बदलणार नाही मात्र पक्षाचे काम आता देश पातळीवर करणार आहे. मि शर्यतीत असेन आणि मला तोडणाऱ्याना नक्कीच उत्तर देइन. पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरून पक्षाअंतर्गत विरोधकांना इशारा.