युवती जिल्हाध्यक्षपदी अॅड.मीता परब तर कार्याध्यक्ष पदी कू.संपदा तुळसकर यांची निवड.
कुडाळ /-
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शिफारशीनुसार युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सिंधूदूर्ग जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या केल्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.युवती जिल्हाध्यक्ष पदी अॅड.मीता परब.व कार्याध्यक्ष पदी कू.संपदा तुळसकर यांची निवड.
सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष पदी अॅड.मीता परब.व कार्याध्यक्ष पदी कू.संपदा तुळसकर यांच्या नियुक्तीची पञे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांच्या हस्ते देण्यात आली या नियुक्ती साठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत.ज्येष्ठ नेते मा.नंदुशेठ घाटे माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले जिल्हा बॅन्कचे उपाध्यक्ष श्री.सुरेशभाई दळवी.प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांचे शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील.उपमुख्यमंञी मा.ना.श्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी जाहीर केल्यानुसार आज या दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पञ देण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे.सरचिटणीस भास्कर परब.युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक.व्यापार उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी कार्याध्यक्ष हिदायतूल्ला खान.व्यापार उद्योग महिला जिल्हाध्यक्षा सौ.चिञा देसाई.ओबीसी कार्याध्यक्ष नझीरभाई शेख.व्यापार उद्योग जिल्हा उपाध्यक्ष आशिष कदम.जिल्हा चिटणीस मकरंद परब.तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर.शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत.याकूब शेख.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्ती नंतर अध्यक्ष व कार्याध्यक्ष आम्ही दोघीही एकाच तालुक्यातील असुन सुद्धा पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीचे सदैव भान ठेवून व जिल्ह्य़ातील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघही जोडीने संपूर्ण जिल्ह्य़ात फिरून संघटनेचे काम करून युवतींची संघटना मजबुत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.