✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.

तर कॉपीमुक्त महाराष्ट्र ही चळवळ राबवल्यामुळे दहावी बारावी मध्ये मुलांनी चांगला अभ्यास केला त्याचा फलित म्हणून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असेही मंत्री केसरकर म्हणाले.मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व त्या त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत शिंदेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल स्थानी कायम राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा टक्केवारीत महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचा निकाल देखील चांगला लागला. सर्वच जिल्ह्यांच अभिनंदन करताना सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. त्यांनी आपला लौकिक कायम ठेवला आहे. त्यासाठी इथले शिक्षक, संस्थाचालक यांच विशेष अभिनंदन करतो. दिव्यांग मुलांचही विशेष कौतुक आहे. ९३ टक्के निकाल त्यांचा लागला आहे. कॉपीमुक्त चळवळ आम्ही राज्यात राबविली. त्यामुळे मुलं अभ्यास करू लागली असून लागलेला निकाल हे त्याचं फलीत आहे. दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.

ते पुढे म्हणाले, अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या सिंधुदुर्गातील शेतकरी बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांचे करण्याचे काम युद्ध पातेवर सुरू आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत ज्यावेळी आचारसंहिता संपुष्टात येईल त्यावेळी नुकसानीबाबत मदत जाहीर केले जाईल.

ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यापर्यंत नुकसान निश्चितच पोचणार आहे याबाबत आम्ही काळजी घेऊ तर दुसरीकडे विज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत जनतेमध्ये तीव्र रोष आहे. कोकणाचा विचार करता या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पडझडीचे प्रकार आहे जास्त घडतात हे कोणाच्या बाबत विचार करता पावसाळ्यात वीज वितरण ज्या कामासाठी मनुष्यबळ जास्त उपलब्ध होण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहे.

अंडरग्राउंड विज वाहीन्याबाबत आज काहीजण टीका करत आहेत परंतु सावंतवाडीसाठी आलेले पैसे ज्यांनी परत पाठवले तेच टीका करण्यात पुढे आहेत त्यांच्यावर काय बोलणार अशी टिका केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर नाव न घेता केली. तर अंडरग्राउंड वीज वाहिन्या टाकण्यासाठी नव्याने कणकवली व सावंतवाडी नगरपरिषद यांचे प्रस्ताव करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page