▪️पावसाळी कालावधित 31 ऑगस्ट पर्यत राहणार बंद..

✍🏼लोकसंवाद /- मालवण.

पावसाळी हंगाम पार्श्वभूमीवर जलक्रीडा बंदी कालावधी आज 26 मे ते 31 ऑगस्ट पासून सूरू होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक आणि जलक्रीडा व्यवसाय बंद करण्याबाबत मालवणच्या बंदर विभागाने जलक्रीडा व्यवसायिक व किल्ला प्रवासी वहातुक यांना यापूर्वीच कळवले आहे. त्यामुळे रविवार 26 मे पासून जलक्रीडा हंगामाची सांगता होत आहे.

मालवण मध्ये गतवर्षी सप्टेंबर मध्ये पर्यटन हंगाम सुरु झाला होता. दिवाळी तसेच नाताळ व थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने मालवणात पर्यटकांनी गर्दी होती. त्यानंतर प्रमुख पर्यटन हंगाम असलेल्या एप्रिल ते मे पंधरावडा या कालावधित लोकसभा निवडणुका तसेच अन्य काही कारणांनी असेल पण पर्यटकांची संख्या मालवणात कमीच होती असे चित्र होते. मात्र, मे पंधरावडा नंतर काहीसे पर्यटक वाढले. गेल्या दहा बारा दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. किल्ले दर्शन तसेच व जलक्रीडा (वॉटरस्पोर्ट्स) हे मालवणच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहेत.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बंदर विभागाने २६ मे पासून किल्ला प्रवासी जल वाहतूक व जलक्रीडा पावसाळी हंगामासाठी बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या. हवामान बघून यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांकडून करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन चार दिवसात मालवणसह जिल्ह्यात कोसळलेल्या वादळी पावस असे वातावरणात होते.

अखेरच्या टप्प्यात पर्यटकांनी मोठी गर्दी..

गोवा येथील जलक्रीडा व सागरी पर्यटन काही दिवस आधीच बंद झाल्याने गोव्यात येणारा पर्यटकही मालवणकडे वळल्याचे दिसून आले. गेले काही दिवस पर्यटकांची गर्दी मालवणात अधिक वाढली. किनारे पर्यटकांनी फुलून गेले. तसेच हॉटेल्स, लॉज देखील पर्यटकांनी गजबजून गेली होती. बंदर जेटी येथे सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून आली. मालवण, दांडी, चिवला बीच येथे जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला होता. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. तसेच मालवण बंदर जेटी नजीकची बंदर विभागाची पार्किंग व्यवस्था देखील अपुरी पडत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page