वेंगुर्ला /-
टपाल दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने कोरोना काळातील कार्याचा विचार करून वेंगुर्ला पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोव्हिड काळात पोस्टमन यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी पोस्टमास्तर, पोस्टमन, सेक्रेटरी व शिपाई यांच्यासह रोटरॅक्टचे अभिषेक साळगावकर, निहार साळगावकर, नितीन कुलकर्णी, नेहा गावडे, साहिली निनावे, प्रितिश लाड आदी उपस्थित होते.