✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार  व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत केदार सखाराम टेमकर सरंबळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला विविध स्पर्धेत कुडाळ तालुक्यातून 450 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
  
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार  व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व तालुक्यात विविध स्पर्धांनी हा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहच्या सांगता समारंभासाठी कुडाळ  जिजामाता चौक येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष श्री काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रांतिक  सदस्य सुनील भोगटे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष  सर्वेश पावस्कर तालुका अध्यक्ष  श्री आर के सावंत जिल्हा सचिव ,श्री प्रभाकर चव्हाण  संदीप राणे अशोक सावंत महिला जिल्हा उपाध्यक्ष, सौ प्रिया धुरी महिला युवक सरचिटणीस ऍड हितेश कुडाळकर  सौ जरीना शेख ,सौ राणी गोसावी परीक्षक समिल नाईक रांगोळकार समीर चांदेरकर कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी पालक महिला आदी उपस्थित होते
    
जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक रोख रुपये 5000 व चषक श्री केदार सखाराम टेमकर ..द्वितीय क्रमांक रोख रुपये 3000 व चषक श्री विजय तुकाराम मिस्त्री… तृतीय क्रमांक रुपये 2000  .व चषक श्री तेजस मंगेश गोसावी तर उत्तेजनार्थ तुषार मिस्त्री व शालेय गटातून कुमारी वैष्णवी प्रकाश बोवलेकर यांना बक्षीस देण्यात आले.. पाट हायस्कूल व इतर ठिकाणी झालेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेते …प्रथम क्रमांक रोख रुपये 1500 व चषक.. कुमारी सोहनी संदीप साळसकर ….द्वितीय क्रमांक रोग रुपये 1000 व चषक कुमारी धनंदा वैभव सावंत …तृतीय क्रमांक रोख रुपये 500 व चषक कुमारी चव्हाण …तर उत्तेजनार्थ कुमारी मिताली संदीप धारवाडकर व मनीषा चंद्रकांत चव्हाण यांना रोख रक्कम चषक देण्यात आला.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा .विजेते यांना रोख रक्कम चषक देण्यात आला… प्रथम क्रमांक मृणाल तोरे (जिजामाता) …द्वितीय क्रमांक सोनक पुरस्कर( छत्रपती शिवाजी महाराज )…तृतीय क्रमांक कावेरी जाधव (जिजामाता )..तर उत्तेजनार्थ  आदिश्री परब, गार्गी तेरसे ,सानवी पावसकर ,विहान करंगुटकर, कारुण्य परब, प्रतीक्षा गोडा, तेजस राऊळ, हेरंब राऊळ, अनुष्का पाटील ,सिद्धी देवाडिगा यांना देण्यात आलं.
  
कथाकथन स्पर्धा …..प्रथम क्रमांक राधिका बरंगुडकर.. द्वितीय क्रमांक वैष्णवी परब …तृतीय क्रमांक विभागून सावली सामंत सार्थक सामन ..तर उत्तेजनार्थ अमूल्य लोंढे, रुद्रप्रभू ,ओवी शिरसाट, दुर्वा प्रभू ,स्वप्नील ओरसकर ,यांना देण्यात आलं.

पोवाडा स्पर्धा प्रथम क्रमांक श्रावणी जाधव… द्वितीयक्रमांक.  विनय गोसावी… तृतीय क्रमांक दुर्वांश धुरी यांना देण्यात आलं.परीक्षक समिल नाईक यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोचले पाहिजे त्यांचे शिवचरित्र आजच्या शालेय विद्यार्थ्यांना समजले पाहिजे या अनुषगाने काका कुडाळकर व त्यांच्या टीमने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला हे निश्चितच कौतुकास्पद आहे सर्वांना प्रेरणा देणारे  आहे असे सांगितले समीर चांदेरकर यांनी रांगोळी स्पर्धासह इतर स्पर्धांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी स्वराज सप्ताहात प्रोत्साहन दिले अनेक स्तुत्य उपक्रम राबविले याबाबत कौतुक केले सूत्रसंचालन ऍड हितेश कुडाळकर यांनी केले आभार सर्वेश पावसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page