✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या कामांची यादीत वाचून दाखवली.भाषणाची सुरुवात करताना आमच्यावर राज्यातील जनतेने काम करण्याची जबाबदारी दिली असल्याचे ते म्हणाले.राज्यातील सर्व नागरिकांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.तर देशामध्ये काही लोकांनी गरिबी हटावचा नारा दिला. मात्र गेल्या पाच वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला आहे असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

गेल्या वर्षभरात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मी सर्व निर्णय सांगण्याचा प्रयत्न केला तर वेळ पुरणार नाही मात्र महत्त्वाचे विषय तुम्हाला सांगतो असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.गेल्या वर्षभरात आपल्या सरकारने शासन आपल्या दारी हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे तब्बल दीड कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचे लाभार्थी जेव्हा माझ्यासमोर येतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटतं असं एकनाथ शिंदे म्हणाले.तसेच ते पुढे म्हणाले सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा देण्याचे काम आपल्या सरकारने केले असून देशात सर्वाधिक लाभ घेतलेले शेतकरी हे आपल्या राज्यात आहेत. तब्बल दीड कोटी शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. याचबरोबर ज्या ज्या वेळी कोणतीही आपत्ती येते त्यावेळी सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे.आपण आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला. याचबरोबर महिलांना देखील सवलत दिली. असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता नियोजन १२ हजार हुन अधिक नागरिकांना मदत मिळाली असून 100 कोटी रुपयांचा वाटप आम्ही केला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यामध्ये जल सिंचन योजना पुन्हा सुरुवात करण्यात आली असून तब्बल सात लाख हेक्टर जमिनींना सिंचन मिळणार आहे. याचबरोबर लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना देखील मदत मिळणार आहे. असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page