✍🏼लोकसंवाद /- कुडाळ अमिता मठकर.

खरारे पेंडुर येथील वेताळगडावरील दरवाजा व बुरुज यांची दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता करण्यात आली.काही दिवसांपूर्वीच झाडाझुडुपांनी दिसेनासा झालेल्या या दरवाजाचा तसेच कोरीव पावलांचा शोध दुर्ग मावळा परिवारातर्फे घेण्यात आलेला होता.याची आज स्वच्छता करून बुरुज व दरवाजा सर्वांच्या समोर आणण्यात आला.वेताळगडावर अशा अनेक गोष्टी अजून समोर आलेल्या नाहीत त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.या स्वच्छता मोहिमेसाठी गणेश नाईक, प्रसाद वारंग, संकेत सावंत, अनिकेत गावडे, नेहा गावडे, प्रसाद पेंडुरकर, महादेव वारंग, संजना मयेकर, सानवी गावडे, आयुष गावडे, कविश गावडे, कादंबरी नाईक, विशाल म्हापसेकर, हिरण्या नाईक इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page