✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
वेंगुर्ले शहरात व आजूबाजूच्या परिसरात सध्या मंदिरातील फंडपेट्यांची चोरी तसेच घरफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर कडक कारवाई होण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट देऊन केली.वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नुकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतलेल्या विद्या जाधव यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. वेंगुर्लेच्या माजी नगराध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते विद्या जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी
माजी जिल्हा बॅक संचालक नितीन कुबल, वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, शहर सचिव स्वप्निल रावळ, सोशल मिडिया सेल अध्यक्ष सुहास मांजरेकर आदी उपस्थित होते.
