✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

नगरवाचनालय वेंगुर्ला या संस्थेचे कार्यकारी मंडळ यांनी सामजिक कार्यकर्ते श्री.नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या कार्यकारिणी समितीच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली.त्याबद्दल नंदन वेंगुर्लेकर यांचा नगरवाचनालयातर्फे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यवाह कैवल्य पवार, सदस्य राजेश शिरसाट, दीपराज बिजितकर, प्रा.महेश बोवलेकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. श्री. वेंगुर्लेकर हे विविध संस्थांवर कार्यरत असून त्यांच्या चतुरस्त्र ज्ञानाचा उपयोग अनेक क्षेत्रात होत आहे. नुकतीच त्यांनी वकिलीची एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page