▪️प्रसारासाठी चित्ररथ वेंगुर्लेत दाखल,योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

शासनातर्फे भात पिकासाठी नाममात्र १ रुपया किमतीमध्ये विमा योजना कार्यान्वित करण्यात आली असून सदर योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांनी केले आहे.दरम्यान प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुक्यात प्रसारासाठी चित्ररथ दाखल झाला असून त्याचे उद्घाटनही आज तहसीलदार श्री. ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३ साठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी आपला सातबारा, बँक पासबुक, पीक पेरा स्वयंघोषणापत्र सह सीएससी सेंटर, पिक विमा कंपनीचे पोर्टल किंवा पिक विमा अॅप द्वारे नोंदणी करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांची विमा कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे.

तहसीलदार यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई, वेंगुर्ला यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजना व इ पीकपाहणी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.

आजच्या चित्ररथ उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार अभिजित हजारे, कृषी पर्यवेक्षक एस बी देसाई, कृषी पर्यवेक्षक एस ए नाईक, कृषी पर्यवेक्षक विश्वनाथ शिवपुरे, तंत्र सहाय्यक राजू गव्हाणे, कृषी सहाय्यक लाडू जाधव, सुरज परब, विमा प्रतिनिधी नयन सावंत व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page