✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

पिंगुळी समर्थनगर येथे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. सिद्धेश गाळवणकर (वय ३५ रा. हुमरमळा) असे त्याचे नाव आहे. या व्यक्तीच्या हातात औषधांची पिशवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा आजारी असल्याने काल कुडाळमध्ये डॉक्टरकडे गेले होते. परंतु, काल ते रात्री घरी पोहोचले नाहीत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांकडून शोध सुरू होता. दरम्यान, आज सिद्धेश यांचा मृतदेह पिंगुळी समर्थनगर येथे आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. सिद्धेश यांचा मृत्यू कसा झाला याबाबत कुडाळ पोलिस माहिती घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page