✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग प्रशांत गवस
दोडामार्ग तालुक्यात कलाकारांची कमी नाही अनेक कलाकार दोडामार्गात आहेत पण “शेजारची होकाल कुड्डी” अशी मालवणी म्हण आहे आणि अजूनही काही मालवणी माणसे या म्हणीला पाठिंबा देत म्हण आपल्या रोजच्या जीवनक्रमात अमलात आणतात त्यामुळे मालवणी माणूस मागे खेचण्याचे काम मालवणी माणूस स्वतः करत असतो आणि ह्यामुळे मालवणी माणूस मागे राहतो व त्याची कला लोकांसमोर येण्यापासून वंचित राहते आणि सतत हेच घडत असल्याने आज दोडामार्ग तालुक्यातील अनेक कलाकार मागे राहिले आहेत. अशा या समस्यांना सामोरे जात आपल्या निश्चयावर ठाम राहत, मेहनत करत हे दोन दोडामार्ग मधील कलाकार आपली कला सादर करण्यासाठी सन मराठी वाहिनी पर्यंत पोहोचले आहेत दोडामार्ग मधील हे दोन कलाकार म्हणजे करण शेटकर आणि विकास तर्फे ही नावे दोडामार्ग वासियांसाठी काही नवीन नाहीत कारण करण शेटकर आणि विकास तर्फे हे दोघेही युट्युब सारख्या सोशल मीडियाद्वारे सतत दोडामार्ग तसेच अनेक लोकांच्या समोर हास्य विनोदातून येत असत कलाक्षेत्रात रंगभूमीची सेवा हीच ईश्वर सेवा मानत काम करण्याची इच्छा व मनी जिद्द बाळगत हे दोघेही सतत कलेच्या अनेक माध्यमातून लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न करत असत मग ते युट्युब चे चॅनल असो किंवा दशावतारी नाटक किंवा युट्युब चॅनेल वर स्वतः लिहिलेले एपिसोड असो अशा अनेक माध्यमातून लोकांच्या समोर येत हास्यविनोद करत लोकांना हसवण्याचे काम करत असत यासाठी त्यांनी स्वतःचा स्वामी प्रोडक्शन या नावाचा यूट्यूब चॅनल देखील काढला आहे त्या चॅनलच्या माध्यमातून ते अनेक हास्यविनोद तसेच एपिसोड लोकांसमोर सोशल मीडिया द्वारे आणत लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत करण शेटकर व विकास तर्फे हे दोघेही दोडामार्गमध्ये झरेबांबर या गावातील असून दोघेही पोलीस दलात होमगार्ड म्हणून काम करत आहेत व होमगार्ड म्हणून काम करत असतानाच हे दोघेही वेळात वेळ काढत मनोरंजन व्हिडिओ तयार करत लोकांसमोर सोशल मीडियाद्वारे मांडत लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करायचे आणि आपल्या मधील कला जिवंत ठेवण्याचे काम करत असत अशीच कला सन मराठी समोर मांडली असता या कलेची दखल घेत सन मराठी वर नवीन सुरू होणाऱ्या वेतोबा या कार्यक्रमात या दोघांना सन मराठीने पोलीसांच्या भूमिकेसाठी संधी दिली असून या दोघांच्याही सर्वत्र मित्रपरिवारातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
