✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात समाजाला स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेत दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग तसेच कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ, असलदे गावठण येथील ग्रामस्थ यांच्या संयोगाने पिराचा दर्गा ते दिविजा वृद्धाश्रम पर्यंत स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.

समाजातील तरुण पिढीला स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबवली गेली. आजी आजोबा, कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे परिसरातील कचरा, प्लास्टिक आवरणे, प्लास्टिक बॉटल, टिन बाटल्या उचलून त्या कचऱ्याचे योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये, खजिनदार अविनाश फाटक यांच्यासह ग्रामस्थ आणि दिवीजा वृध्दाश्रमातील आजी आजोबा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page