✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

दिनांक २ जुलै २०२३ रोजी किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले.प्रतिवर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे जुलैच्या पहिल्या आठवड्यात गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण केले जाते. या वर्षीच्या वृक्षारोपण साठी किल्ले निवती व वेताळगडची निवड करण्यात आलेली आहे. या वृक्षारोपण साठी कदंब झाडाची निवड करण्यात आली. या झाडांसाठी श्रीमती दर्शना लांबर यांनी सौजन्य केले. या वृक्षारोपण मोहिमेसाठी गणेश नाईक, प्रसाद सुतार, पंकज गावडे, शिवाजी परब, वैभव परब, मानसी परब, दिपाली परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page