▪️आ. वैभव नाईक,संजय पडते, जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवदेन..
✍🏼लोकसंवाद /- ओरोस.
शेकडो बांग्लादेशी नागरिकांना पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळाला असून शासनाच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जमिनीवर बसून आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.तदनंतर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन बांग्लादेशी नागरिकांना पी. एम. किसान योजेनचा लाभ मिळवून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला असून प्रशासनाने त्यांचे अर्ज वैध ठरवून सात सात हप्ते त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.त्यामुळे स्थानिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे भूमिका जिल्हावासीय व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने निषेध व्यक्त केला. तसेच सरकार आपल्या दाराशी लाभार्थी झाले बांग्लादेशी! शिंदे -फडणवीस सरकारचा निषेध असो, बोगस लाभार्थी निवडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! आवाज कुणाचा शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो! हमारा नेता कैसा हो वैभव नाईक जैसा हो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांना आ. वैभव नाईक यांनी पीएम किसान योजनेच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांबाबत विचारणा केली त्यावेळी श्री. सुकटे यांनी प्रांताधिकारी ,तहसीलदार यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. प्रथम दर्शनी १०८ पैकी ५२ लाभार्थी अपात्र आहेत ते पश्चिम बंगाल, बिहार येथील असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी असे लाभार्थी आहेत का याबाबतही तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून चाचपणी सुरु असल्याचे सांगितले. यावेळी आ. वैभव नाईक, संजय पडते यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.जान्हवी सावंत यांनी परप्रांतीय कामगारांची आपल्याकडे नोंद आहे का? याची विचारणा केली.
प्रलंबित दाखले लवकरात लवकर द्या – आ.वैभव नाईक
कुडाळ तहसिल कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या दाखल्यांची ९० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.तर प्रांत कार्यालयाकडून दिले जाणारे जातीचे सुमारे २५० दाखले सर्व्हर डाऊन व कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे प्रलंबित आहेत. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांना विचारणा करत लवकरत लवकर सर्व प्रलंबित दाखले देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शहर प्रमुख संतोष शिरसाट,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,उपतालुकाप्रमुख सचिन कदम, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, माजी उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच पूनम पवार,अतुल बंगे,राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख कृष्णा तेली,सुशील चिंदरकर,शेखर गावडे,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, संदीप म्हाडेश्वर,दीपक आंगणे, नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर,बाळा कांदळकर,बाळू पालव, नगरसेवक उदय मांजरेकर, सुनील जाधव, अवधूत मालणकर,रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर,विकास राऊळ, आबा मुंज,पप्पू म्हाडेश्वर, सागर भोगटे,गंगाराम सडवेलकर,नगरसेविका श्रेया गवंडे,नगरसेविका ज्योती जळवी,मृणाल परब, तळगाव सरपंच लता खोत, दर्शना म्हसकर, मंगला ओरोसकर,ममता वेंगुर्लेकर,साक्षी सावंत, राजश्री पवार,स्नेहा चव्हाण,मंदार खोटावळे, बाळू सावंत, बाळा पवार,अविनाश पाटकर, प्रताप साईल,महेश परब, हरी वायंगणकर, नरेंद्र राणे, रवी कदम, प्रदीप गावडे, पिंट्या गावडे, नागेश करलकर, आणा भोगले, नितीन राऊळ, बाबी गुरव, गोट्या चव्हाण , आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.