✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

दापोली शहरातील आसूद जोशी आळी या ठिकाणी ट्रक आणि वडाप यांची समोरासमोर टक्कर झाली या भीषण अपघातात आठ जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.या अपघातातील मृतांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे तर जखमीचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर तात्काळ त्यांनी कालच्या अपघाताची माहीती घेतली त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोबाईलच्या माध्यमातून फ़ोन करुन अपघाताची माहिती दिली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचे जाहीर करण्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिले.त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ती मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page