✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी अंगणवाडी शाळेमध्ये नगरसेविका कुमारी चांदणी शरद कांबळी यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा.

कुडाळ-मालवण विधानसभा
” आंतरराष्ट्रीय योग दिवस “

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. मोदीजींच्या या ९ वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रहिताचे अनेक निर्णय घेतले गेले, ज्यामुळे केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे. या यशस्वी ९ वर्ष पूर्णत्वाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात मोदी@9 अभियान राबविण्यात येत आहे..
या अभियानांतर्गत एक महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे *” आंतरराष्ट्रीय योग दिवस.”भारतीय धर्म संस्कृतीमधील ” योग ” संकल्पनेची मांडणी श्रीमद् भगवतद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याच योग संकल्पनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त करून ‘२१ जून’ हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्याचे महत्त्वपूर्ण काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे..बुधवार दिनांक २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका कुमारी चांदणी शरद कांबळी यांनी लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी अंगणवाडी शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसमवेत समवेत कार्यक्रम साजरा करण्यात आला. अंगणवाडीच्या संचालिका सौ शैलजा कांबळी मदतनीस स्नेहा राऊळ मॅडम उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page