▪️शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होणार.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेत मिळत नाही म्हणून यावर्षी कोकण रेल्वे द्वारे झाराप रेक पॉईंट वर खत ऊतरविण्याचा निर्णय झाला आहे. खत कंपन्या व कोकण रेल्वे यांनी मान्यता दिली असून, या मंजुरीचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. यावेळी सुफला व युरिया अशी 2300 मॅट्रिक टनाची मागणी आपण केली होती. व या सर्व मागण्यांबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालय मुंबई येथे खरीप हंगाम आढावा बैठक घेऊन विशेष लक्ष दिल्यामुळे 25 मे पूर्वी आवश्यक असलेले खत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नुकतीच मुंबई मंत्रालयत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेतली होती. खरीप हंगाम आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरवर्षी या जिल्ह्यात खतपुरवठा उशिराने होतो व बोगस खतांचा या जिल्ह्यात एजंटामार्फत पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते याबाबत आपण या बैठकीत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. या बैठकीला मी उपस्थित होतो, कृषी विभागाचे अधिकारी व कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक घेतली होती. त्यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीने हे महत्त्वाचे निर्णय झाले मनीष दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामासाठी 11000 पेक्षा जास्त मॅट्रिक टन खताची आवश्यकता असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यातील काही खत मे महिन्यात उपलब्ध होणे आवश्यक असते. म्हणून 1800 मॅट्रिक टन सुपला व पाचशे मेट्रिक टन युरिया खताची मागणी आपण नोंदवली होती. आरसीएफ या खत कंपनीने हे खत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. व हे खत आता थेट रेल्वेने झाराप रेक पॉइंट वर उतरले जाईल. मोठ्या गोदामाची उपलब्धता नसल्यामुळे हे तालुका खरेदी विक्री संघाच्या गोदामा मध्ये रेक पॉइंटवरून नेण्यात येईल व थेट शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघामध्ये उपलब्ध होईल. जवळपास 25 मे च्या पूर्वी झाऱ्यात येते हे खत उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला संपर्क साधून आपल्या मागणीनुसार हे खत उपलब्ध करून घ्यावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाच कोटी पेक्षा जास्त अर्थसाहयाची आवश्यकता असते. म्हणूनच जिल्हा बँकेने हे पाच कोटी कर्जाची उचल जिल्ह्यातील सहकारी सोसायटी यांना दिली आहे. सहा महिन्याच्या मुदती करता हे कर्ज असून या शेतकऱ्यांच्या कर्जावर पाच टक्के कमी व्याजदर आहे. खत कंपन्या डोकीने खत वितरण करण्याचे धोरण असल्यामुळे शेतकऱ्यांना हे विना सहज कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे या दृष्टीने सोसायटीला हे कॅश क्रेडिट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मनीष दळवी यांनी दिली.

झाराप येथे गोदामाला मान्यता.

घरात रेल्वे स्टेशनच्या एक पॉईंट नजीक नऊ कोटी रुपये खर्च करून शासनाच्या वतीने 3000 मेट्रिक टन क्षमतेचे एक गोदाम बांधण्यास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. लगेचच्या काळात हे गोदाम पूर्ण झाल्यास गोदामाचे प्रश्न मार्गी लागेल. कोकण रेल्वेने ही आपल्या जागेत आणखी गोदामाच्या इमारती उभ्या करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे असेही सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page