✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

मुंबई गोवा महामार्गावर गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच परशुराम घाटाचा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातील पर्यायी मार्ग म्हणून चाकरमान्यांनी चिरणी आंबडस मार्गावर आपली वाहने वळवली आहेत. त्यामुळे चिरणी आंबडस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page