✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.
केर येथील श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात आज मंगळवारी दिनांक ९ मे रोजी खासदार विनायक राऊत यांनी कार्यक्रमात हजेरी लावली.दोडामार्ग तालुक्यातील केर हा गांव आदर्श आहे. हे मी वाचले होते. आज येथील संघटनशक्ती, स्वागत परंपरा पाहून हे मी अनुभवत आहे. येथील गावाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी माझ्या खासदार निधीचा वापर झाल्यास मला आनंद वाटेल, असे भावोदगार खासदार विनायक राऊत यांनी काढले.
केर येथे श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत अतुल रावराणे, शैलेश परब, बाबूराव धुरी, संजय गवस, संतोष मोर्ये, बाळा गावडे, मिलिंद नाईक, संदेश वरक या शिवसेना पदाधिकारी समवेत केर- भेकुर्ली सरपंच रुक्मिणी नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्री. राऊत यांनी, ग्रामीण भागातील एक गांव केरच्या रूपाने सांघिक शक्ती कशी असावी, आपल्या गावाचा अभिमान ठेवून वागत आहे हे आदर्शदायी आहे.
(दिशादर्शक फलकांचे कौतुक) खासदार विनायक राऊत यांनी येथील दिशादर्शक फलक कुतूहलाने पाहिले. केर गावातील जी जैवविविधता आहे ती छापुन त्यावर दिशादर्शक स्वरूप हे नावीन्यपूर्ण असल्याचेही ते म्हणाले.