✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

युवा उद्योजक भजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदुळी, तालुका कुडाळ शाळेचा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने विशाल परब यांनी ५०,००० रुपयाची देणगी दिली व यापुढे ही आपण आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले कांदोळी सारख्या ग्रामीण भागातील एक शाळा आयएसओ मानांकनासाठी पात्र ठरते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राचा भूषण आहे या शाळेचा बोध घेऊन जिल्ह्यातील अशा अनेक शाळा आयएसओ मानांकन झाल्या पाहिजे असे मत विशाल परभणी व्यक्त केले

यावेळी व्यासपीठावर श्री विशाल परब श्री प्रकाश मोर्ये श्री विजय चव्हाण गटविकास अधिकारी कुडाळ, श्री धोत्रे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग सौ संजना म्हाडगूत सरपंच वाडोस श्री संजय म्हाडगूत उपसरपंच वाडोस श्री राजा धुरी ग्रामपंचायत सदस्य वाडोस श्री संदीप म्हाडगूत तंटामुक्ती अध्यक्ष वाडोस श्री तळवनेकर केंद्रप्रमुख वडोस श्री किरण सावंत, प्रवीण सावंत,श्री संजय आइर, मुख्याध्यापक श्री नरेश खरात, श्री गोटोसकर गुरजी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page