✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना काल ( ता.१) महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले.यावेळी कोल्हापूर चे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद,विभागीय वनाधिकारी सागर गवते,दक्षता वनवृत्त कोल्हापूर आदि उपास्थितीत होते.या कार्येक्रमात देवसु चे वनपाल सदानंद परब ,सावंतवाडी लेखापाल मृणाल कुलकर्णी,मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत ,आंबोली वनमजूर ज्ञानेश्वर गावडे यांना ही गौरविण्यात आले.
