✍🏼लोकसंवाद /- देवगड.

फणसे गावात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत फणसे गावात तात्काळ सर्व्हे मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली आहे. सर्व रूग्णांचे रक्तनमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.फणसे गावात २७ मार्च रोजी डेंग्यूसदृश सहा रूग्ण आढळले. या रूग्णांना सुरूवातीला ताप येत होता त्यानंतर त्यांचे प्लेटलेटस कमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान यातील ५ रूग्णांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते तर एका रूग्णावर सरीता हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. तात्काळ पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यसेवक व आरोग्य कर्मचाèयांचे पथक गावात पाठवून घरोघरी सर्व्हे करून सर्वांना आवश्यक खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या तसेच साचलेले पाणी काढून टाकण्यात आले.सर्व रूग्णांची प्रकृती चांगली असल्याने घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पडेल प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधकारी डॉ. आशीष मोहड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page