✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

हिंब्ज हॉलिडे प्रा. लि. आर्थिक अपहार प्रकरणी ७ वर्षांहून अधिक काळ फरारी असणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता: करण्यात आली आहे.आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.

हिंब्ज हॉलीडे नावाची कंपनी स्थापन करून मोठ्या रकमेची आमिषे दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी संजय गोविंद गुरव रा. सायन मुंबई याची मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ.सानिका जोशी यांनी २५,००० रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.संशयीत आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर,ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.

संशयिताने हिंब्ज हॉलिडे नावाची कंपनी स्थापन करून लोकांना मोठ्या रकमेची आमिषे दाखवून, मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारून, स्वीकारलेले पैसे परत न करता आर्थिक अपहार केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानक, देवगड पोलीस स्थानक, सावंतवाडी पोलीस स्थानक येथे भा. द. वि कलम ४०६,४२०,३४ तसेच महाराष्ट्र ठेवी दारांचे हित संरक्षण कायदा १९९९ कलम ३ व ४ नुसार २०१४ साली गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा ७ वर्षां पेक्षाही जास्त काळ फरारी होता.या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीस दिनांक २०/०१/२०२३ रोजी अटक करून न्यायालयात हजार केले आता त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी देऊन त्यानंतर न्यायालयीन कोठडीचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान संशयिताकडून मे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान ॲड विवेक मांडकुलकर यांचा आरोपी तर्फे युक्तिवाद ग्राह्य मानून मे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी संशयीत आरोपीची २५,००० रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page