✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील शाळकरी मुलांना नेताजी सुभाषचंद्र बोस ही शाळा सुरू होत आहे.त्या शाळेमध्ये ५०० मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.या शाळेत प्रवेश दिला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेची एक,एक,,मॉर्डन शाळा सुध्दा होणार आहे.दरम्यान शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकान्यांनी काम करण्यासाठी एक जरी रूपया मागितला तरी त्या अधिकान्याचे तात्काळ निलंबन केले जाईल असे परिपत्रकच आपण काढले असल्याचे ना. केसरकर त्यांनी सांगितले.यावेळी ना. दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन महिलांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यावेळी आमदार रविंद्र फाटक,माजी खा. ब्रिगेडियर सुधिर सावंत, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, आदि उपस्थित होते.

यावेळी ना. केसरकर म्हणाले की,महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग माझ्याकडे आहे.त्यामुळे शाळकरी मुलांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील त्यासाठी आपले प्रयत्न आहेत.आता सर्व मुलांना युनिफॉर्म देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शुज,सँग तसेच पुस्तकांसोबत वह्या (तिसरी ते आठवी पर्यंत) मुलांना दिल्या जातील. आता आपला सिधुदुर्ग जिल्हा आदर्श म्हणुन उभा राहणार आहे.

आताच झालेल्या अर्थसंकल्पात कोकणाला झुकते माप देण्यात आले आहे. राज्यभरात ७५ हजार नोकर भरतीचा कार्यक्रम घेतला आहे.त्यात ३० हजार शिक्षकांची पदे अंतभूत आहेत. मच्छिमान्यांसाठीही कोई केसरकर पत्रकार परिषदेत बोलत १३ हजार कोटींची तरतुद करण्यात सांगितले.

आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्यावर पक्ष निरीक्षक म्हणुन जबाबदारी निश्चित केली आहे.त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी आपले काम सुरू होणार आहे.आगामी जिल्हा परिषद्, पंचायत समिती व नगरपंचायत यासर्व निवडणुका दरम्यान पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे आमदार तथा पक्ष निरीक्षक रविंद्र फाटक यांनी सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page