✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

गांजा विक्रिप्रकरणी सूत्रधाराची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील आरोपी वैशाली प्रकाश आसोलकर हिला दिनांक ०१.०३.२०२३ रोजी रेडी येथून तिने आरोपी प्रथमेश उदय कैटकर व परेश उदय कैटकर यांना गांजा विक्री केल्याप्रकरणी अटक केली. व्याकामी पोलीसांच्या म्हणण्यानुसार आरोपी वैशाली ही गांजा विक्री प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे. आजरोजी तिला कुडाळ न्यायालयापुढे हजर केले असता कुडाल येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम. अश्विनी जे. बचुलकर यांनी रक्कम रु. १५,०००=०० चे जातमुचलक्यावर अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहीले.

यातील हकीगत अशी की, यातील आरोपी प्रथमेश उदय कैटकर व आरोपी परेश उदय कैटकर यांना त्यांच्याकडून दिनांक ०१.०४.२०२२ रोजी – ५०१ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला म्हणून त्यांच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीमय १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (अ). २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. दिनांक ०१.०४.२०२२ पासून उपरोक्त आरोपी यांना ०६.०४.२०२२ पर्यंत पोलीस कोठडीमंजूर करण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर तपासाच्या दरम्यान उपरोक्त दोन आरोपी यांनी सदरचा गांजा हा आरोपी- वैशाली प्रकाश आसोलकर हिने त्यांना विक्रीत केला असे पोलीसांच्या निदर्शनास आले. म्हणून सुमारे ११ महिन्यांच्या कालावधीनंतर तिला अटक करून फौजदारी न्यायालय कुडाळ येथे हजर केले असता आरोपी हिस २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तद्नंतर दिनांक ०४.०३.२०२३ रोजी उपरोक्त आरोपी हिंस कुडाळ येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने आरोपीची अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. सुनिल माळवणकर, ॲड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page