✍🏼लोकसंवाद/-कुडाळ अमिता मठकर

“विद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या सुविधा व पुरक गोष्टी उत्तमपणे पुरविण्याचे उपक्रम शाळांमधून घेतले जातात त्यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व मुलं आपला सर्वांगीण विकासाच्या दिशा ठरवू शकतात .असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण (विशेष भूसंपादन अधिकारी)यांनी काढले .त्या बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सीबीएसई -सेंट्रल स्कूल च्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये (स्नेहसंमेलनात)प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. आपल्या पुढील मनोगत मध्ये “विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी त्याला उर्जितिवस्थेमध्ये आणण्याचा ध्यास घेऊन काम केल्यास मुलांप्रति असलेली तळमळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल .मात्र यासाठी विद्यार्थ्यांना समाज माध्यमापासून दूर ठेवून विद्यार्थ्यांतील स्पुल्लिंग प्रज्ज्वलित करण्याचा प्रयत्न करावा.” असे सांगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था शैक्षणिक उन्नती बरोबर विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याना चालना देण्यासाठी जे प्रयत्न करत आहे; उपक्रम राबवित आहेत ते फारच स्तुत्य आहेत. त्यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. यासाठी पालकांनी शिक्षकांच्या सानिध्यात राहून मुलांच्या प्रगतीचा ध्यास घेतल्यास मुलांच्या विकासाची तळमळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल .”असे सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे डॉक्टर जी.टी राणे ,प्रा.राहुल देशमुख , पालकवर्ग इत्यादी उपस्थित होते.

‘भक्तीरंग’ ही थीम असलेल्या या स्नेहसंमेलनात संत साहित्य, लोकनृत्य, गीत गायण तसेच महाराष्ट्रातील विविध लोककलावर आधारित कार्यक्रमाची रेलचेल होती.प्री प्रायमरी पासून ते बारावी पर्यंतच्या मुलांनी आपल्या कलागुणांचा उत्तमपणे अविष्कार केला .त्यामध्ये वस्त्रहरण नाटकातील प्रवेशाने रसिकांची मने जिंकून घेतली .तर प्रेक्षकांमधून आलेली विद्यार्थ्यांची पालकांचा समावेश असलेली दिंडी ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा वझे व ऋचा कशाळीकर यांनी केले.

तत्पूर्वी याच दिवशी सकाळच्या सत्रामध्ये मध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या मध्ये वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 58 महाराष्ट्र बटालियन (एनसीसी)यांचे कमांडिंग ऑफिसर सन्माननीय श्री दीपक दयाल हे उपस्थित होते. विविध उपक्रमामध्ये व स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून असे विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले व विद्यालयाचे नाव रोशन करा. असा संदेश देऊन सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शनही मुलाला लाभले.

यावर्षीचा ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून इयत्ता दहावीच्या कुमार अनुज भोगटे याला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशेल फर्नांडिस आणि पौर्णिमा ठाकूर यांनी केले यावेळी व्यासपीठाव‌र शुभांगी लोकरे विभा वझे बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, ज्युनिअर कॉलेजचे मंदार जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page