✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ पुरस्कृत आणि जि.प.प्राथ.श्री गणेश विद्यालय नेरुर वाघोसेवाडी शाळा आयोजित तालुकास्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून माननीय सरपंच सौ.भक्ती घाडीगावकर आणि माननीय श्री .रुपेशजी पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री.वेतुरेकर र्श्री.काका गावडे,उपसरपंच श्री.दत्ताजी म्हाळदळकर,ग्राम.पं.सदस्य प्रवीणजी नेरूरकर,ग्राम.पं.सदस्य मंजुनाथजी फडके,ग्राम.पं.सदस्य श्री .संतोषजी कुडाळकर,ग्राम.पं.सदस्य श्री.पपु नारींग्रेकर,ग्राम.पं.सदस्य शंभु नाईक,श्री.सतीश सांवत,सामाजिक कार्यकर्ते श्री.अजित मार्गी,माजी सरपंच श्री.शेखरजी गावडे,श्री .रविंद्र गावडे,वाघोसेवाडी शाळा मुख्याधापक श्री.प्रसादजी कुंटे ,सहशिक्षिका.सौ.पूर्वा गावडे बाई,मुख्य पंच श्री.अमृत काणेकर,उपपंच,श्री.विश्वास पवार,सहपंच श्री.अश्विन मांजरेकर,श्री.राजा शृंगारे,श्री.विराज परब ,ग्रामस्थ, उपस्थित संघ शिक्षकवर्ग व सर्व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.या स्पर्धेत नऊ शाळा व अकरा संघानी सहभाग घेतला होता.यास्पर्धेत विजेता संघ हा जि.प.प्राथ.सराफदारवाडी शाळा ब संघ ठरला.तर उपविजेता संघ जि.प.प्राथ.गोंधयाळे शाळा संघ ठरला तर तृतीय विजेता संघ हा जि.प.प्राथ.शाळा आंबडपाल हा संघ ठरला.
विजेत्या संघाना व सहभागी संघाना पंचाच्या हस्ते चषक व प्रमाणप्रत्रक देऊन गौरवण्यात आले.यास्पर्धेसाठी मैदानाची व्यवस्था ही श्री.शशिकांत नेरुरकर ,मयुर आडेलकर,निखिल परब,जतिन राऊळ,श्री संतोष कुडाळकर,राहूल परब,यांनी केली .नास्टा व जेवण व्यवस्था हीश्री.शेखरजी गावडे व श्री संतोष कुडाळकर यांनी केली तर सर्व हे प्रवीण नेरुरकर यांनी दिले.तर प्रमाणप्रत्रक ही राजा शृंगारे यांनी दिली.या स्पर्धेसाठी इतर मदत ही श्री.रुपेशजी पावसकर यांनी केली.तर या स्पर्धेचे सुत्रसंचालन सौ.पुर्वा गावडे बाई आणि आभार हे श्री प्रसाद कुंटे गुरुजीनी मांडले.