✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुक्यातील नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन गुरुवारी रात्री अपघात झाला होता. यामध्ये हयगयीने व अविचाराने ट्रक चालवून अपघात करून स्वतः सह अन्य एकाच्या दुखापतीस व ट्रकच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक बसप्पा मरेंप्पा एकोंडी रा बेळगांव याच्यावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चालक व त्याचा सहकारी दारूच्या नशेत आहेत. या मार्गावरून वाळू व चिऱ्याची जीवघेणी वाहतूक सुरू असून पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाहीत. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात , असा आरोप संतप्त स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थानी करून या वाहतुकीवर नियंत्रण आणण्या बाबतचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पंचनामा करायचा नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. डंपर व ट्रक वाहतूक या रस्त्यावरून जाऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानीं अशा वाहतुकीबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.२० वा. च्या सुमारास यातील ट्रक चालक बसप्पा मरेप्पा एकोंडी रा. बेळगाव, हा आपल्या त्याचे लाब्यातील ट्रक मध्ये चिरे (जांभा दगड) भरून गाव चौके ता. मालवण ते एमआयडीसी कुडाळ मार्गे मुंबई गोवा हायवेने धारवाड येथे जात होता. यावेळी नेरूर गोदियाले गणेश गावडे यांचे घरासमोर हा ट्रक आला असता ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात हयगयीने व अविचाराने रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवला व रस्त्याचे डाव्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिली. यात इलेक्ट्रिक पोलला धडक देऊन नुकसान करून स्वतःचे व सोबत असलेल्या गाडी मालक शिवराजकुमार चेन्नया गुरवय्यनवर यांच्या दुखापतीस तसेच ट्रकचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक बसप्पा मरपा रा. बेळगाव याच्याविरुद्ध कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीरंग टाकेकर यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली आहे. अपघातानंतर चालक व त्याचा सहकारी पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र ग्रामस्थानी त्या दोघांना ताब्यात घेतले. कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार एस एन टाकेकर व पोलीस तेथे दाखल झाले. ट्रकचे नुकसान झाले तर वीज खांब वाकून विद्युत वाहिन्या जमिनीच्या दिशेने खाली आल्या. त्या तुटून जमिनीवर पडल्या असत्या तर अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेनातर पिंगुळी व नेरूर गावाच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास चार तासा नंतर तो सुरळीत करण्यात आला.
अपघातस्थळी नेरूर चे माजी सरपंच शेखर गावडे, मनसेचे दीपक गावडे,बाबल गावडे, जगन्नाथ गावडे, नेरूर ग्रा प . सदस्य प्रभाकर गावडे, प्रसाद गावडे, अजित मार्गी, मिलिंद धोंड, अभिषेक गावडे, गणेश गावडे, राजन पुरलकर, दाजी महाजन, रवि गावडे अनिल गावडे, सतोष गावडे, रामा काबळी, साईराज जाधव, नीलेश गवाणकर, महेश राणे यांच्यासह सुमारे
150 ते 200 ग्रामस्थांचा जमाव होता. चेकपोस्ट गेली तीन वर्ष बंद आहे. ते सुरू करावे, तसेच तेथील सी सी टिव्ही कॅमेरा बंद आहेत.ते सुरू करून भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या वर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.