✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात श्री. चंदुलाल पटेल हे संशयित आरोपी विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले याचा राग मनात धरून त्यांना मोटरसायकल वरून पाडून, जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व तोंडावर दगडाने गंभीर दुखापत करून मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी क्र २ कय्यूम अब्दुलबारी खान मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या राहणार कुडाळ याची मे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी २५,००० रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.
दिनांक ०३/११/२०२२ रोजी कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात श्री. चंदुलाल पटेल हे संशयित आरोपी विरुद्ध तक्रार देण्यासाठी आले याचा राग मनात धरून त्यांना मोटरसायकल वरून पाडून, जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व तोंडावर दगडाने गंभीर दुखापत करून मारहाण केल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार संशयितांवर भा. द. वि कलम ३०७,३४१,५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होत. त्यानंतर संशयितांना दिनांक ०४/११/२०२२ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तद्नंतर आरोपी बरेच दिवस न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान संशयित आरोपीच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद ग्राह्य आरोपीची २५,०००/- रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.