✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ-नाबरवाडी येथील साई कला,क्रीडा मित्र मंडळ नाबरवाडी व बांधकाम सभापती नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात झालेल्या एकेरी नृत्य स्पर्धेच्या खुल्या गटात मृणाल सावंत हिने तर लहान गटात दीक्षा नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला.१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ-नाबरवाडी येथील साई कला क्रीडा मित्र मंडळ नाबरवाडी व बांधकाम सभापती नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन शिवभक्त निघाले आणि ११ वाजता नाबरवाडी येथे शिवज्योतीचे आगमन झाले. व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे आणि शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. शिवजयंती निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांसाठी खेळ घेण्यात आले.संध्याकाळी शिवजयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संचिता फडके यांचे समई नृत्य, मानसी वाळकेचा पोवाडा, साईल सातार्डेकर याच्या राजं आलं आणि इशिता गवंडे हीच्या माय भवानी नृत्याने झाली. एकुण ५५ स्पर्धक सहभागी झाले होते. विविध स्पर्धकांनी आपली नृत्यकला सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण तुशांत सोनावणे मुंबई व सागर सारंग (देवबाग) यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन नागेश नाईक यांनी केले. या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे.

खुला गट ,प्रथम क्रमांक – मृणाल सावंत द्वितीय क्रमांक – नेहा जाधव तृतीय क्रमांक – संजना पवार ,लहान गट, प्रथम क्रमांक – दिक्षा नाईक द्वितीय क्रमांक – आरव आईर तृतीय क्रमांक – अंतरा ठाकुर,विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावस्कर, कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवीका सौ. श्रुती वर्दम यांनी कार्यक्रमाला भेट दिली.

साई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजू गवंडे, सूरज गवंडे, साईश नाबर, धनंजय परब, रोहित राऊळ, , जयेश कावले, प्रथमेश राऊळ, शार्दूल कांबळी, तन्मय कुनकावळेकर, केतन वरवडेकर, मंगेश वरवडेकर, राजाराम तोरस्कर सर, राजू खानोलकर, हेमंत गवंडे, सिद्धेश राऊळ, समीर गवंडे, सचिन खोत, सचिन महाडिक, गोटया पंडीत, गुरु गडकर, ओंकार राऊळ, मिहिर खानोलकर, शिवम गावडे, मंथन कुमटेकर, वेदांत कुपेरकर, प्रथमेश नाईक, प्रणाली गवंडे यांनी मिळून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला प्रेमदास राठोड, उदय बाणे, सुबोध राऊळ, न्हानू गावडे, सचिन खोत, संजय परब, जयसिंग बांदेकर, श्रीराम काजरेकर, हेमंत शिरसाट, अमित शिरसाट आणि चिंतामणी साऊंड सर्वीस यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page