एक लाखांचा थोटावला दंड तर,तीन महिन्यांनसाठी मासेमारी परवाना केला रद्द..
✍🏼लोकसंवाद /- मालवण.
ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ चे कलम ४ नुसार पारित केलेल्या अधिसूचना ५ फेब्रुवारी २०१६ तसेच २३ ऑगस्ट २०२२ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरी मिरकरवाड्यातील सुहान सोफिया (आयएनडी एमएच ०४ एमएम ४३१४) या नौकेचे मालक जबीन साखरकर यांना १ लाख रुपयांचा दंड सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र राजम यांनी ठोठावला आहे. तसेच ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.’मुणगे येथील १७ वाव समुद्रात २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ च्या सुमारास या ट्रॉलरद्वारे पर्ससीन मासेमारी केली जात असल्याचे मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेला आढळून आले होते.यावेळी मत्स्य परवाना अधिकाऱ्यांनी नौकेचे तांडेल मोहम्मद अली नूर मोहम्मद सुनकाथ (रा. भटकळ-कर्नाटक) यांना जप्ती नोटिसीद्वारे नौका देवगड बंदरात घेऊन येण्यासाठी आदेश दिले. परंतु इंजिन बेल्ट तुटला व ऑईल पाईप फुटला, अशी कारणे देऊन तांडेलाने नौका देवगड बंदरात घेऊन जाण्यास नकार दिला होता. दरम्यान, याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी प्रतिवेदन दाखल करण्यात आले होते. त्यावर गुरुवारी झाली.