लोकसंवाद /- परुळे.
परुळे आनंदवाडी कोरजाई येथीय प्राचीन पाच पांडव मंदीरात महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. येथील मंदीरात दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आहे “18 फेब्रुवारी रोजी सकाळी पुजा, अभिषेक सायंकाळी४. वाजता भजन, रात्री 8(वाजता श्री. विलास केरकर याचे किर्तन. १९ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता भजन रात्रौ 8 वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळाचे नाटक किमिच्छक व्रत’ होणार आहे. पहाटे काकड आरतीने उत्सवाची सांगता होईल तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाच पांडव मंदिर देवस्थान कमिटी (आनंदवाडी) यांनी केले आहे. परुळेबाज़ार येथील श्री. गौरीशंकर मंदीर येथे ही महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने विविध धार्मिककार्यक्रम होणार आहेत.
