✍🏼लोकसंवाद /- परुळे.

आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना2020.21 या करिता.परुळेबाजार ग्रामपंचायतीचे मुल्यमापन पंचायत समिती सावंतवाडीच्या समितीने,भेट देऊन केले स्मार्ट ग्राम म्हणजेच आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार
योजनेसाठी.तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीचे पाहणी
करण्यात आली.यावेळी.परुळेबाजार.ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी केली. या समितीमध्ये गटविकास अधिकारीवासुदेव नाईक,सहा.गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण एकनाथ सावंत विस्तार अधिकारी कृषी.गजानन धरणे सुजीत यरवळकर विस्तार अधिकारी यांचा समावेश होता.योजनेच्या निकषांच्या अनुषंगाने अभिलेख,तपासणी केली.यावेळी परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रा.पं.सदस्य,प्रदिप प्रभु सिमा सावंत ग्रामसेवक शरद शिंद ग्रा पं.कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी,आरोग्य कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.यावेळी ग्रा पं.तीच्या वतीने राबविण्यात आलेल्याविविध उपक्रमांचीही माहीती घेण्यात आली तालुक्यातील ग्रा.पं.ती परुळेबाजार शिरोडा.आडेलि,मातोड,मठ,म्हापण केळुस पालकरवाडी यांची पाहणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page