✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ कुडाळ यांच्यावतीने राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध काळ्या फीती लावून करण्यात आला. यावेळी वारीशे यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली तसेच याप्रसंगी निषेधाच्या घोषणाही उपस्थितांकडून देण्यात आल्या.
यावेळी घडलेल्या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविला सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणा ऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुका पत्रकारानी काळ्या फिती लावून काम केले वारीशे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे मात्र तो अपघात नसुन घातपात आहे हे उघड होत आहे व गाडीने ठोकर देत दुदैवीमृत्यू हा योगायोग् नसून कट रचुन केलेला खुनच असल्याने या घटनेचा आम्ही जिल्हयातील पत्रकार तीव्र शब्दात निषेध नोदवितो.यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष कृष्णा सावंत कुडाळ तालुका उपाध्यक्ष मिलिंद धुरी कुडाळ तालुका सचिव आनंद कांडरकर अल्लाउद्दीन खुल्ली सद्गुरु घवणलकर. उपस्थित होते
