लोकसंवाद /- देवगड.
कुणकवण (गावठणवाडी) ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी बाळकृष्ण गोसावी यांचा मुलगा प्रीतेश वय २४ वर्षे याच्या पायाला दुखापत होऊन पाय जायबंदी झाला होता.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पायावरील शस्त्रक्रियेचा डॉक्टरांनी सांगितलेला सुमारे १ लाख रुपये खर्च त्यांना न परवडणारा होता. त्यामुळे ही बाब त्यांना खारपाटण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात येऊन मंगेश गुरव यांना सांगितली.त्याची गंभीर दखल घेत कु.प्रितेष गोसावी यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री साहयत्ता निधीतून सुमारे ५०,००० /- रुपयांची आर्थिक मदत नुकतीच मिळवून दिली.
याबद्दल प्रीतेष याचे वडील व कुणकवण गावचे रहिवासी बाळकृष्ण पांडुरंग गोसावी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जाहीर आभार मानले. यासाठी यशस्वी पाठपुरावा करीतबाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे श्रीकांत शिंदे फाउंडेशन गटाचे डॉ धवल, श्री गुजर खारेपाटण – तळेरे विभागाचे प्रमुख मंगेश गुरव यांनी मोलाची मदत केली.
देवगड तालुक्यातील कुणकवण गावचा रहिवासी असलेल्या प्रितेश गोसावी याचा कॉलेज मध्ये कबड्डी खेळताना त्याच्या डाव्या पायाची नस तुटून त्याला ईजा झाली होती. त्यामुळे तो फ्रॅक्चर होऊन जायबंदी झाला होता. त्याच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्याला प्रचंड त्रास व्हायला लागला. मग डॉक्टरांनी त्याला पून्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला मात्र १ लाख ३० हजार रुपये एवढा खर्च त्यांना सांगण्यात आला. अगोदरच मुलासाठी हजारो रुपये कर्ज काढून त्रस्त झालेले श्री बाळकृष्ण गोसावी यांनी खारेपाटण येथील उद्योजक किरण सामंत संपर्क कार्यालय तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात भेट देऊन आपले म्हणणे मांडून लेखी निवेदन दिले होते. याची तातडीने दखल घेऊन खारेपाटण येथे पक्ष कार्यालय उघडुन एक महिना होत नाही तोपर्यंत कुणकवण ता. देवगड येथील ग्रामीण भागातील एका गरीब व गरजू गोसावी कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल प्रितेश याचे वडील बाळकृष्ण गोसावी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्याचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
