सिंधुदुर्ग /-

ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंचांची निर्दोष मुक्तता : आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर करून ग्रामपंचायतीकडे प्राप्त होणारा महसूल कर रक्कम, शासकीय अनुदान या रकमेचा विविध कामांसाठी दप्तरी खोट्या नोंदी करून खर्ची दाखवून चेक द्वारे व परस्पर रकमा काढून बनावट नोंदी करून कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायतीला नुकसान होईल व स्वतःचा फायदा होईल या उद्देशाने सन २००७-०८ मध्ये रक्कम रुपये २,७६,७५४ आणि सन २००८-०९ मध्ये रक्कम रुपये १,९५,७७६ अपहार केल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर कामी सरकारपक्षा तर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारातील तफावती, आरोपी तर्फे वकील ॲड.विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.फडतरे साहेब यांनी प्रिया दिपक बोभाटे रा. पडवे, चंद्रकांत ठाकूर रा. रानबांबुळी, धायाजी केशव परब रा. पडवे, जयश्री साबाजी परब रा. रानबांबुळी यांची निर्दोष मुक्तता केली. सदर केसचे कामी ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page