✍🏼लोकसंवाद /- मालवण.

बांधिवडे पालयेवाडी येथील भाजपचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, पुष्पक घाडीगावकर, नारायण परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. यावेळी योगेश मेस्त्री, अभिजीत घाडीगावकर , महेंद्र हिर्लेकर ,मनिषा हिर्लेकर,आबु घागरे, यशवंत परब,बाबाजी परब या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, शिवउद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गावकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे,उपविभागप्रमुख अनिल गावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर,संजय राणे,शाखा प्रमुख मधुकर परब, गुंडूपंत मिठबावकर, स्वप्नील मुणगेकर, निशांत मुणगेकर, बाबी राणे, संतोष घाडीगावकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page