लोकसंवाद /-दोडामार्ग.

साटेली-भेडशी प्रभाग क्रमांक ०४ मधील ग्रामस्थांचे सुरू असलेले साखळी उपोषण तब्बल १४ सुरु होते मात्र अखेर १४ दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण दरम्यान संबंधित रस्ता खुला करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून कारवाई सुरू होती, २५ रोजी संबंधित रस्ता खुला करण्यात येईल असे उपोषणकर्त्यांना पत्रही दिले होते. मात्र २४ रोजी ग्रामपंचायतीला याबाबत न्यायालयाकडून पत्र प्राप्त झाले त्यामुळे या रस्त्याबाबत न्यायालयात दावा सुरू असून न्यायप्रविष्ट असल्याने पुढील आदेश येईपर्यंत हा रस्ता खुला करता येत नाही असे पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर अखेर शुक्रवारी हे उपोषण मागे घेण्यात आले.हे पत्र मे दिवाणी न्यायाधीश दोडामार्ग यांच्या न्यायालयात जमीन मालक विरभद्र सावंत व सीताबाई परब यांच्या वतीने ॲड. ए.बी.कविटकर सावंतवाडी यांनी दावा ५२/२०२२ दाखल केला असता सदर केस जमीन मालकांच्या वतीने केलेल्या न्यायालयात युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने ग्रामपंचायतीला मनाई आदेश दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page