दोडामार्ग /-

दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच ०७सियु ३१५४) या वाहानावरील चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात झाला असून हा प्रकार शनिवारी रात्री ३.०० च्या सुमारास घडला.यात चालक वाहक किरकोळ जखमी झाले.तर गाडीचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की घाटमाथ्यावरुन आपल्या ताब्यातील गाडी( एम एच ०७ सि यु ३१५४) दोडामार्गच्या दिशेने बॉयलर कोंबडीची वाहतुक करत असताना गाडीला अपघात झाला.सदरचा अपघात हा चालकाचा वाहानाचा भरधाव वेग असल्याने अपघात घडला असल्याचे ग्रामस्थतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page