कणकवली /-

आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा,अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळी सणात भारतीय नोटांवर गणपती किंवा लक्ष्मी यांचे फोटो असावेत,अशी मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर नोटांवरचे फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या चर्चेत श्री. राणे यांनी उडी घेतली असून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असावी, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान हे आपले वैयक्तिक मत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. पुढच्या पिढीला तो मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे नोटांवर त्यांचा फोटो असावा, असे राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page