जास्तीत जास्त संघानी सहभागी होण्याचे असोसिएशनचे आवाहन..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशनची २०२२-२३ ची पुरुष व महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित केली आहे.महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या ५८ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत भाग घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिनिधीक संघातील खेळाडू निवडीसाठी ही प्रमुख स्पर्धा राहील. यामध्ये जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशनचे अस्थाई समिती अध्यक्ष संदीप तावडे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित रहावयाचे आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरस येथे होणार आहे.

स्पर्धेसाठी संघानी १०० रुपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. यासाठी २२ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेपर्यंत प्रवेश स्विकृती राहील. काही कारणास्तव खेळाडूंचे नावासहीत प्रवेश अर्ज मुदतीत पाठविणे शक्य नसल्यास तसे लेखी कळवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था इत्यादी सर्वांना प्रवेश मिळेल. इतर नियम प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर सामानाधिकाऱ्यांना दिसेल असा क्रमांक असणे गरजेचे आहे. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था केलेली नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी आपला प्रवेश अर्ज २२ ऑक्टोबरपर्यंत या tausandeep@gmail.com ई-मेलवर पाठवावा असे आवाहन श्री. तावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४३०७९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page