सिंधुदुर्ग /-

राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि.21) शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढले आहेत.*

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे

1. जयंत मीना (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड

2. सौरभ कुमार अग्रवाल (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग

3. स्मिता पाटील (अपर पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई

सुधारीत पदस्थापना

4. पवन बनसोडे (पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ते पोलीस अधीक्षक, यवतमाळ

5. जी. श्रीधर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक हिंगोली

तर गौरव सिंह व संदीप सिंह गिल याच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी आले.तर शुक्रवारी याबद्दल स्थगिती येते न येते तोच सायंकाळी पुन्हा दाभाडे यांच्या जागी अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बढतीपर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

गुरुवारी झालेल्या आदेशामध्ये औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक म्हणून बढती देण्यात आली होती. तर श्री. दाभाडे यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण जाहीर केलेले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी श्री. दाभाडे हेच पुढील आदेश होईपर्यंत सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राहतील असे स्पष्ट करण्यात आले. तर सायंकाळी प्राप्त आदेशानुसार सौरभ कुमार अग्रवाल यांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान श्री दाभाडे यांना अद्याप नवीन जागी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page