कणकवली /-
कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृती विषयी चौकशी केली. तसेच सिंधुदुर्ग विभागाच्या आपत्कालीन निधीमधून स्वराच्या उपचारासाठी मदत देण्यात आली.
यावेळी घाडीगांवकर समाजाचे पदाधिकारी सर्वश्री विजय गावकर, सूर्यकांत घाडी, प्रदीप घाडी, विलास गांवकर, लक्ष्मण घाडीगावकर, बुधाजी गावकर, उमेश घाडीगावकर, अशोक घाडीगांवकर, स्वराचे आईवडील संतोष घाडीगावकर आणि संजना घाडीगांवकर, स्वराच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत आणि शिक्षिका वैष्णवी आदी उपस्थित होते.