पुणे /-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं होतं.त्याचं उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होतं.मात्र नामांतराच्या वादानंतर शिंदे यांच्या हस्ते होणारं उद्घाटन रद्द करण्यात आलं आहे.

शिंदे समर्थक आणि माजी नगसेवक यांनी महापालिकेच्या जागेवर उद्यान उभारलं होतं. हे उद्यान त्यांनी स्वखर्चातून उभारलं असल्याचा त्यांना दावा आहे. तीन महिन्यांपुर्वी हे उद्यान उभारण्यात आलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती मिळताच पुण्यातील काही सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतला.वयक्तिक नाव उद्यानाला देता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे हे नाव नियमबाह्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याच नावाच्या उद्यानाचं उद्घाटन एकनाथ शिंदे करणार असल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उद्यानाचं एकनाथ शिंदे हे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आपण विचार करु, असं त्यांनी म्हटलंय. मात्र सध्या उद्घाटन रद्द करण्यात आलं आहे.

उद्यानावरचं नाव झाकण्याची वेळ

शिंदे समर्थक आणि माजी नगसेवक यांनी महापालिकेच्या जागेवर उद्यान उभारलं होतं. हे उद्यान त्यांनी स्वखर्चातून उभारलं असल्याचा त्यांना दावा आहे. तीन महिन्यांपुर्वी हे उद्यान उभारण्यात आलं होतं. मात्र हे नाव नियमबाह्य आहे. नाव देण्याची नियमावली असते. पालिकेच्या परवानगीची गरज असते. याची पुर्तता न केल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आणि उद्यानावरील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच त्यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आल्याने अनेक ठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना प्रभागासाठी बजेट आणून विविध विकास कामे केली. त्यांच्या नावावर प्रभावित होवून आणि नागरीकांकडे प्रस्तावर देत या उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने या उद्यानासाठी निधी उपलब्ध केला नव्हता त्यामुळे मी स्व-खर्चातून हे उद्यान उभारलं होतं. मात्र आता मी मान्य करतो माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत प्रमोद भानगिरे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page