वेंगुर्ले
देशाच्या शूर सैनिकांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि बलिदानाचे प्रतिक म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासियांसाठी महत्वपूर्ण असून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ले परबवाडा येथे केले. वेंगुर्ले भाजपाच्या वतीने दरवर्षी कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार करुन त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात येतो. यावर्षी सुध्दा भाजपाचे कार्यकर्ते अरुण ठाकुर यांच्या हस्ते नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवणकर यांचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. संतोष चेंदवणकर हे १९९४ साली सैन्यात दाखल झाले, त्यांनी राजस्थान, जम्मू काश्मिर व पंजाब याठिकाणी २५ वर्षे देशसेवा केली. तसेच २८ फेब्रुवारी २०१९ रोजी नायब सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी संपूर्ण सेवाकाल आर्मड कोअर मध्ये घालविला. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ता.चिटणीस समिर चिंदरकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस, रविंद्र शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, कृतिका साटेलकर, बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर, रुपेश ठाकुर आदी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page